शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

किंकाळी.....

भळभळती हाक.....

धुळ तुमच्या चरणाची
ललाटावर लावतो आहे,
बाबा पुन्हा याल का
वाट तुमची पाहतो आहे.

दुभंगला माणुस येथे
माणुसकी आटली आहे,
न्यायाची तलवार येथे
पुर्वीच कधी बोठली आहे.

माणुस झाला क्रुर,भोगी
लचके फुका तोडतो आहे,
स्वार्थापायी कित्येकाचे
मस्तक आता फोडतो आहे.

       कवि-©राम भिमराव पाटोळे(R.B.P.)
                अहमदनगर,मो.नं.7028255007

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा